

Major Crackdown: Police Seize Gutkha Worth Rs 27 Lakh in Islapur
ईस्लापूर : आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा व पान मसाला इस्लापूर परिसरात जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व इस्लापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.