अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी दानशूरांची साथ

baradshevala.jpg
baradshevala.jpg


बरडशेवाळा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथील तीन अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी दोन्ही अंगणवाडी केंद्र रंगरंगोटी करून भिंती बोलक्या सामाजिक बांधिलकीतून झाल्या असल्याने शिक्षणासाठी फायदेशीर ठरल्या आहेत. पालकही आपल्या मुलांना आवडीने पाठवत आहेत; पण गेल्या कित्येक वर्षांपासून वार्ड क्रंमाक एकसाठी हक्काची इमारत नसल्याने कधी शाळेत, तर कधी समाज मंदिरात, खासगी खोलीत, खासगी मालकाला काही अडचण आली तर बाहेर वट्ट्यावर बालकांना आहार व शिक्षण घ्यावे लागत होते.


शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडी पासून सुरू होतो. शासनाने लाखो रुपये खर्च करून बरडशेवाळा वार्ड क्रमांक एकची अंगणवाडी इमारत २०१६-१७ मध्ये इमारत बांधकाम करण्यात आले, तर सर्व गावांचे पाणी अंगणवाडी आवारात साचत असल्याने व नवीन इमारत गळत असल्याने दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा निधी उपलब्ध करण्यात आला. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाने लाखो रुपये खर्च करूनही इमारत असूनही बंद असल्याने बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात अंगणवाडी भेट देऊन सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून महत्त्व पटवून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी प्रयत्न केले. 

हेही वाचा - राज्य अजिंक्यपद रग्बी स्पर्धेत सातारा, ठाण्याला विजेतेपद ​
योगायोगाने त्याच आठवड्यात तहसीलदार जीवराज डापकर यांनी सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहून दानशूर व्यक्तींनी शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मार्गदर्शन केले होते. वर्तमानपत्रातून नेहमी बातमी प्रकाशीत केल्या गेल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील पहिल्या दोन अंगणवाडी रंगरंगोटी डिजिटल करून भिंती बोलक्या करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तर याही अंगणवाडीसाठी मोबाईल संदेश गावातील ग्रुपमध्ये देऊन व्यक्तिगत मोबाईल दिला. 

पंचेचाळीस हजार रुपये जमा
याला प्रतिसाद देत गावचे सध्या पुणे येथे कार्यरत असलेले भूमिपुत्र गंगाधरराव माणिकराव मस्के (वित्त लेखा अधिकारी) यांना दिल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २० हजार रुपये दिल्याने अंगणवाडीची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या झाल्या. तर अधिकारी व दानशूर व्यक्तींनी मोबाईल संदेशांद्वारे ग्रुपमध्ये पंचेचाळीस हजार रुपये जमा केल्याने बालकांना शिक्षणाची सोय झाली आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‍घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात योणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com