
वाळूज महानगर : दुचाकी शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला समाधानकारक सेवा न दिल्याने एका ग्राहकाने रागाच्या भरात स्वत:ची दुचाकी पेटवून दिली. ही घटना मंगळवारी (ता.२६) दुपारी ४ः३० वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील एका शोरूममध्ये घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.