
वसमत : वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारातील एका शेतात सात जनावरे कापून त्यांचे अवशेष घटनास्थळी फेकून दिले अन मांस पळविल्याचा प्रकार रविवारी ता. ३ सकाळी उघडकीस आला आहे. जनावरे तस्करी करतांना पोलिस व गोरक्षकांकडून अडविले जात असल्याने आता तस्करांनी नवा फंडा हाती घेतल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील जनावरांचे अवशेष तपासणीसाठी कुरुंदा येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात आणले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारात मारोती खुळखुळे यांचे मुख्य रस्त्यालगत शेत आहे.