
कळंब : मराठा समाजातील युवक-युवतींच्या उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जावरचा व्याज परतावाही लाभार्थ्यांना दिला जातो; मात्र धाराशिव जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना गेल्या २०२३ मधील चार, तर २०२४ मधील अकरा महिने असे महिन्यांपासून हा परतावाच मिळाला नसल्याने महामंडळाकडील अनुदान संपले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.