
वर्षाला पाच लाखांचे उत्पन्न; दुधाने आणला शेतकऱ्याच्या जीवनात ‘गोडवा’
नायगाव : जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असल्यास कमी भांडवलात देखील आपण स्वतःच्या पायावर उभा राहून चांगले उत्पादन घेऊ शकतोत. हे सिद्ध करून दाखवले नायगाव येथील सुनील मेनकुदळे यांनी. सुनील यांनी एक गिरगाय खरेदी केली. त्या गाईपासून आता १० गाई तयार झाल्या. गीर गायीचे दूध आयुर्वेदिक असल्याने दुधास चांगली मागणी आहे. यातून त्यांना वर्षाकाठी पाच लाखांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळत आहे.
हेही वाचा: Union Budget 2022 : निर्मला सीतारामन यांची अशी झाली एंट्री
सुनील यांना वडिलोपार्जित अडीचएकर शेत जमीन. ती कोरडवाहू, त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण म्हणून सुनील यांनी पूर्वी दूध व्यवसाय सुरू केला. स्वतः गावातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून बाजारपेठेत विक्री करण्यास सुरवात केली. त्यातून टप्प्याटप्प्याने प्रगती करत दूध खरेदीचा व्यवसाय वाढत गेला. म्हणून त्यांनी स्वतः एक गिरगाय खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या गाईचे चांगल्या पद्धतीचे पालन-पोषण करत त्याच गाईपासून १५ वर्षांत १० गाई तयार झाल्या आहेत.
गाईची संख्या वाढत गेल्यावर सुनील मेनकुदळे यांनी मुक्त संचार पद्धतीचा गोठा निर्माण केला. त्यात सर्व गाई व एक वळू सोडला. गोठ्यात स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्त पद्धतीच्या गोठ्यामुळे गाईंना आजार कमी होतात, त्यांना गोचीडाची लागण होऊ नये, म्हणून त्याच गोठ्यात १०० कोंबड्याचे कुक्कुटपालन देखील केले आहे. यामुळे औषध उपचारांवर होणारा खर्च कमी होऊन, उत्पन्न वाढत जात असल्याचे सुनील सांगतात.
हेही वाचा: Union Budget 2022 : निवडणुका असलेल्या पाच राज्यांना काय मिळणार?
सुनील यांनी एका गाईपासून सुरू केला व्यवसाय आता पाच लाखांपर्यंत पोहोचला असून, त्यांना या गाईपासून वर्षाकाठी पाच लाख निव्वळ दुधातून उत्पादन मिळत आहे. सध्या ६० रुपये प्रति लिटर दुधाची विक्री होत आहे. याच बरोबर मुक्त गोठ्यात कुक्कुट पालन केल्याने महिन्याकाठी पाच हजारांचे अंड्यापासून देखील उत्पन्न सुरू झाले आहे.
हेही वाचा: Union Budget 2022: शेअर मार्केटची सकारात्मक सुरूवात
स्वतःची शेती सेंद्रिय
गाईंसाठी मुक्त संचार गोठा असला तरी वर्षाकाठी यातून पंधरा ट्रॅक्टर शेणखत मिळत आहे. यातून सुनील मेनकुदळे हे स्वतःची शेती सेंद्रिय पद्धतीने करत असून, सेंद्रिय पद्धतीच्या शेतीतून त्यांना वर्षाकाठी तीन लाखांचे निव्वळ उत्पादन मिळत आहे.
Web Title: Annual Income Of Five Lakh Milk Brings Sweetness To Farmer Life
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..