Dharur Ghat Accident : धारूर घाटात पुन्हा अपघात; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली विचारपूस

तीव्र उतारावर ब्रेक न लागल्याने मळीचा टँकर दुर्घटनाग्रस्त; चालक-वाहक बालंबाल बचावले.
ramdas athawale

ramdas athawale

sakal

Updated on: 

किल्लेधारूर - धारूर शहराच्या पायथ्याशी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वरील अरुंद आणि धोकादायक घाटात पुन्हा अपघात झाला. गुरुवारी (ता. १६) केजकडून माजलगावकडे मळी घेऊन जाणाऱ्या टँकरचे तीव्र उतारावर ब्रेक न लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकरचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत चालक आणि वाहक बालंबाल बचावले. दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) या मार्गावरून जात असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास अपघातग्रस्त टँकर आला. त्यांनी थांबून अपघातग्रस्तांची विचारपूस केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com