हुश्श..! बीडचे आणखी पाच स्वॅब निगेटिव्ह, स्वॅबची तपासणी  

दत्ता देशमुख
Saturday, 4 April 2020

आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून ३६, तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातून २४ अशा ६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बीड - परिसरातील जिल्ह्यांत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळत असताना शनिवार (ता.चार) बीडकरांसाठी दिलासादायक ठरला. शुक्रवारी (ता.तीन) पाठविलेल्या तीन स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आणि हे पाचही अहवाल निगेटिव्ह आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात ६० लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

मागच्या तीन दिवसांत पाठविलेल्या २१ अहवालांमध्ये सर्वाधिक दिल्ली आणि परदेशातून परलेल्यांच्या स्वॅबचा समावेश होता. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातून ३६, तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातून २४ अशा ६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा - हे तीन अ‍ॅप ठरले महत्त्वाचा दुवा - बीडमध्ये बाहेरून आलेल्या ७० हजार जणांची नोंद

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. यात कोरोना विषाणूबाबत अफवा, सामाजिक तेढ, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, संचारबंदी व जमावबंदी आदी विविध आदेश निर्गमित केले. पोलिसांनी याबाबत सूचना केल्यानंतरही न ऐकणाऱ्या आतापर्यंत ५६२ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात सोशल मीडियावरून सामाजिक तेढ आणि विषाणू फैलावाच्या अफवा पसरविलेल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते’ या प्रत्ययानुसार गुन्हे दाखल करून अशा मंडळींवर पायबंद घातला आहे. 

हेही वाचा - राजीनामा देऊन परतणारा डॉक्टर अपघातात जखमी

धारूरमध्ये गुन्हा 
किल्लेधारूर : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शनिवारी (ता. चार) तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. 
शहरातील रंगार गल्लीतील मशिदीनजीक रस्त्यावर आरोपी रईस युसूफ कुरेशीसह तिघांनी तोंडाला मास्क न लावता अन्य व्यक्तींना बोलून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस जमादार शेख खमरपाशा यांच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार उपनिरीक्षक श्री. बाष्टे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another five swab negatives in beed district