Antarvali Sarati: आरक्षणाची घोषणा होताच अंतरवाली सराटीत मोठा जल्लोष!

Antarvali Sarati celebration
Antarvali Sarati celebration sakal

Antarvali Sarati: मराठा समाजाला आरक्षण बाबत निर्णय होचाच व अध्यादेश मिळतात अंतरवाली सराटी येथे शनिवार ता.27 रोजी मुख्य उपोषण स्थळी मोठा जल्लोष करण्यात आला.

अंतरवाली सराटी येथे मुख्य उपोषण स्थळी मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके फोडुन जल्लोष केला. अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व समस्त समाज बांधव यांनी मागील सात महिन्यांपासून जो लढा उभारला होता त्याला यश मिळाले.आरक्षण बाबत अंतरवाली सराटी हे राज्यातील मुख्य केंद्र बनले आहे या ठिकाणी आणेक सभा ,बैठाका,मोर्चा, व आंदोलन बाबत दिशा ठरवली जात होती.

Antarvali Sarati celebration
Maratha Victory: मिळवून दाखवलं का नाही! मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना खिजवलं!

अखेर आज शनिवार ता. 27 रोजी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले व तो अध्यादेश मनोज जरांगे यांना देण्यात आला.

ही घोषणा करताच समाज बांधवांनी गावात जल्लोष केला. घोषणनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू आहे. या ठिकाणी आंदोलन करीता सात महिन्यापासून किर्तन, जागर सुरू होता. आरक्षण मिळावे करीता या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 आक्टोंबर रोजी समाजाची विराट सभा संपन्न झाली होती,मनोज जरांगे यांना या गावात समाज बांधवांनी मोलाची साथ दिली. गावात मनोज जरांगे यांचे आगमन झाल्यावर मोठा जल्लोष होणार असुन लवकरच पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे असे आपल्या भाषणात मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.

Antarvali Sarati celebration
Maratha Reservation: आरक्षणाची घोषणा होताच मराठा समाज बांधवांचा जल्लोष; गंगापूरात राज्य सरकारचे मानले आभार

मनोज पाटील जरांगे यांनी आरक्षण साठी जो लढा उभारला त्याला यश आले आहे. या मुळे गोर गरीब विद्यार्थी व समाज बांधव यांना मोठा फायदा होईल.

उद्धव तारख, ग्रामस्थ अंतरवाली सराटी

मनोज जरांगे यांच्या प्रयत्नाला यश आले आरक्षण बाबत निर्णय झाल्यामुळे आज आमची खरी दिवाळी आहे

काकासाहेब तारख, ग्रामस्थ अंतरवाली सराटी

Antarvali Sarati celebration
Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या अखेर कोणत्या मागण्या झाल्या मान्य? एका क्लिकवर घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com