
बीड : अभ्यासातील सातत्य, अपार मेहनत आणि स्वप्नांवर अढळ विश्वास यांच्या बळावर बीडच्या अनुराग बाबासाहेब मोरे याने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत यश संपादन केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून देशात २३ वा क्रमांक, तर सामान्य गुणवत्ता यादीत ६०८ वा क्रमांक मिळवून अनुरागने संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.