चिंता वाढली: हिंगोलीत पुन्हा चारजणांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली २० वर

file photo
file photo
Updated on

हिंगोली : मालेगाव येथून परतलेल्या राज्य राखीव दलाच्या तीन जवानासह एसआरपीएफ जालना जवानाच्या संपर्कातील आनखी एका व्यक्‍ती अशा एकूण चोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल गुरवारी (ता. ३०) प्राप्त झाला. आता कोरोना बाधितांची संख्या २० वर पोहचली असल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्‍ह्‍यातील सर्वच आस्‍थापना (ता.तीन) मेपर्यंत बंद ठेवल्या आहेत.

आजघडीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हिंगोली एसआरपीएफचे १५ जवान व जालना एसआरपीएफचा एक असे एकूण १६ जवान पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर यातील १३ जवान हे मालेगाव येथे कार्यरत होते. आणि उर्वरित तीन जवान हे मुंबई येथे कर्तव्यावर होते.
जालना येथील एसआरपीएफ जवानाच्या संपर्कातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. 

एसआरपीएफ जवानांना सर्वाधीक बाधा

तसेच जालना जवानाच्या संपर्कातील त्याचा चार वर्षाचा पुतण्या व गुरुवारी (ता. २९) दाखल झालेल्या व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यत हिंगोली जिल्‍ह्‍यात एकूण २१ कोवीड- १९ चे रुग्ण झाले आहेत. त्‍यातील एका व्यक्‍तीचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे डिस्‍चार्ज दिला आहे. व 20 रुग्ण सद्यस्‍थितीला पॉझिटीव्ह आहेत. 

बाधीतांची संख्या २० वर पोहचली

आजघडीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हिंगोली एसआरपीएफचे पंधरा व जालना एसआरपीएफचा एक असे एकूण सोळा जवान, दोन बालके व दोन व्यक्‍ती पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून तीन मे पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

येथे क्लिक कराडॉ. शंकरराव चव्हाणांनी केला होता वैधानिक विकास मंडळास विरोध...काय होते कारण...
 
विनाकारण रस्त्यावर फिरु नका- प्रशासन

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. कोरोनाविरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MLA Baburao Kadam Kohalikar demands retaining Hadgaon and Himayatnagar talukas under Nanded district instead of Kinwat
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
45-Day Spiritual Journey Begins: Sacred Bullock Pair to Lead Sant Eknath Maharaj’s Palkhi
Search for Missing Toddler Ends in Tragedy; Village Grieves Four-Year-Old's Death
Marathi News Esakal
www.esakal.com