कोणत्याही शस्त्रक्रियेपुर्वी कोरोना चाचणीसाठी करणार पाठपुरावा : वैद्यकीय मंत्री

हरि तुगावकर
Tuesday, 9 June 2020

खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून कोवीड १९ची लागण न झालेल्या रूग्णावर उपचार करावेत असे आवाहन करून कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित रूग्णांची सशुल्क कोविड १९ तपासणी करण्याबाबत अनुमती मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

लातूर : खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून कोवीड १९ची लागण न झालेल्या रूग्णावर उपचार करावेत असे आवाहन करून कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित रूग्णांची सशुल्क कोविड १९ तपासणी करण्याबाबत अनुमती मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

येथील भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए), दंतवैद्यकीय, आयुर्वेदीक, होमिओपॅथी आदी संघटनाच्या पदाधिकाऱयासोबत मंगळवारी (ता.नऊ) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय ढगे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ.अजय जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.कल्याण बरमदे, डॉ. संजय पौळ, डॉ.राजकुमार दाताळ, डॉ.पुरूषोत्तम दरक, डॉ. कांतीलाल शर्मा आदी उपस्थित होते.

Breaking : लातूर जिल्ह्यात आढळले आठ कोरोना पॉझिटीव्ह

जिल्हा शल्यचिकित्सक, आयुक्त आणि अधिष्ठाता यांनी समन्वय समिती स्थापन करून वेळोवेळी खासगी डॉक्टरांच्या अडचणी समजून घ्याव्यात. डॉक्टरांनी सुरक्षा साधनांचा वापर करून करोना नसलेल्या रूग्णांना सेवा द्यावी. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांसाठी पर्यायी लागणाऱ्या औषधांचा साठा ऊपलब्ध करून ठेवावा. विलगीकरण कक्षात रूग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी आदी सूचना श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या. शहरातील डॉक्टरांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मला फक्त एक एसएमएस करावा.

आनंदाची वार्ता : आणखी सात जणांची कोरोनावर मात, लातूरकरांना दिलासा

मी त्यांची अडचण तातडीने दूर करण्याचा प्रयत्न करीन असे सांगून मी आपल्या सेवेसाठी सदैव तयार असल्याचे श्री.देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकी दरम्यान इतर खासगी प्रयोगशाळांना कोवीड १९ चाचणी करण्याची परवानगी द्यावी, जलदगीते चाचणी करण्याची अनुमती द्यावी, खासगी रूग्णालयातही कोवीड रूग्णांच्या उपचारात परवानगी द्यावी, पीपीई किट वापरून पॉझिटिव्ह रूग्णांची तपासणी केली तर विलगीकरण करू नये, खासगी रूग्णालयातही कोवीडसाठी बेड आरक्षित करावेत, ज्यामुळे पैसे भरण्याची क्षमता असलेल्या रूग्णांची सोय होईल, खासगी डॉक्टरांनाही विमा कवच द्यावे, पीपीई किटचा जीएसटी माफ करावा आदी मागण्या डॉक्टर संघटनाच्या प्रतिनिधींनी यावेळी केल्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before Any Operation There Is Corona Test, Said Medical Minister