शाॅटसर्कीटमुळे उपकरणांचा कोळसा; कर्मचाऱ्यांच्या तप्तरतेने मोठा आनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या निजी कक्षातून दुपारी 3:30 च्या दरम्यान अचानक धुराचे लोट बाहेर येवू लागले. कार्यालयात एकच धावपळ सुरू झाली, कर्मचार्यांनी आग्नीशामक हॅड बंबच्या साह्याने निजी कक्षातील इनव्हरटरला लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

नांदेड : जिल्हापरिषद ईमारतीच्या दुसर्या मजल्यावरील मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या निजी कक्षातून दुपारी 3:30 च्या दरम्यान अचानक धुराचे लोट बाहेर येवू लागले. कार्यालयात एकच धावपळ सुरू झाली. लागून असलेल्या सामान्य प्रशासनातील काही कर्मचारी निजी कक्षाकडे धावले असता वायरींग जळाल्याचा उग्र वास आला. तिक्का बांधकामचे कार्यकारी अभियंता बडे यांच्यासह कर्मचार्यांनी आग्नीशामक हॅड बंबच्या साह्याने निजी कक्षातील इनव्हरटरला लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान  मुख्य कार्यकारी  अधिकारी लोहा तालुक्याच्या दौर्यावर असल्याची माहिती आहे. शाॅटसर्कीटमुळे विजपुरवठा खंडीत करण्यात आला असून महानगर पालिकेचे आग्नीशामक दल घटनास्थळावर दाखल झाले आहे. आग विझली असली तरी निजी कक्षातील फर्निचरयुक्त छत, तसच उपकरणांची आग्नीशामक दलाकडून पहाणी  करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apparatus burnt due to short circuit quickness of the staff prevented annoyance