
शिरूरकासार : जम्मू व काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीमसारख्या थंड प्रदेशाचे सफरचंद हे मुख्यफळ. मात्र आता ते मराठवाड्याच्या भूमीतही रुजत आहे. विशेष म्हणजे कोळवाडीच्या कुशीत सध्या बहरलेली सफरचंदाची बाग अनेकांची लक्ष वेधून घेत आहे. यासाठी शेतकरी विशाल सव्वासे यांची प्रयोगशीलता फळाला आली आहे.