धनगर समाजबांधवकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर

भास्कर लांडे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सेलू तालुक्यात धनगर युवकाच्या आत्महत्येनंतर बंदचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे गंगाखेड तालुक्यातही सकाळपासून प्रतिष्ठाणे, दुकाने उघडण्यात आली नाहीत. तरीही गंगाखेडत युवकांनी दुचाकीवर फेरी मारून बंदचे आवाहन केले.

परभणी - धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील गंगाखेड आणि सेलू तालुक्यात बंद पुकारण्यात आला. तर सोनपेठ आणि पाथरीत मोर्चास सुरवात झाली असून पुर्णेत धरणे आंदोलन करण्यात आले.

सेलू तालुक्यात धनगर युवकाच्या आत्महत्येनंतर बंदचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे गंगाखेड तालुक्यातही सकाळपासून प्रतिष्ठाणे, दुकाने उघडण्यात आली नाहीत. तरीही गंगाखेडत युवकांनी दुचाकीवर फेरी मारून बंदचे आवाहन केले. पाथरीत आणि सोनपेठ तहसिलवर मोर्चास सुरवात झाली आहे. पुर्णे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असून परभणी शहरातील श्री. खंडोबा मंदिरात बैठक घेण्यात आली. तदनंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ते जिंतूर, पालम, मानवत तहसिलदारांना देण्यात येत आहेत. तत्पूर्वीच बैठकीत समाजबांधवांकडून शांततेचे आवाहन करण्यात आल्याने सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीत आहेत. तरीही सुरक्षेच्या दृष्टाने पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला असून जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Application of Demand to district collectors for Dhangar Reservationby