Parbhani News : नियुक्ती एका शाळेत, अध्ययन दुसऱ्याच शाळेत ; शिक्षिका मराठी माध्यमाची, चार महिने उर्दू शाळेवर, पाथरी तालुक्यातील प्रकार

जिल्हा परिषदेच्या एका शाळेवर नियुक्ती असलेल्या एक सहशिक्षिका येण्याजाण्याचा त्रास होऊ नये म्हणून, गेल्या चार महिन्यांपासून दुसऱ्याच शाळेवर शिकवित असल्याचा प्रकार घडला आहे. मराठी माध्यमाच्या या शिक्षिका चार महिन्यापासून उर्दू शाळेवर अध्ययन करत होत्या हे विषेश.
Parbhani News
Parbhani Newssakal

पाथरी : जिल्हा परिषदेच्या एका शाळेवर नियुक्ती असलेल्या एक सहशिक्षिका येण्याजाण्याचा त्रास होऊ नये म्हणून, गेल्या चार महिन्यांपासून दुसऱ्याच शाळेवर शिकवित असल्याचा प्रकार घडला आहे. मराठी माध्यमाच्या या शिक्षिका चार महिन्यापासून उर्दू शाळेवर अध्ययन करत होत्या हे विषेश. याबाबत तक्रार झाल्यानंतर गटशिक्षण अधिकारी शिवाजी गित्ते यांनी त्या शिक्षिकेस नियुक्ती असलेल्या मूळ ठिकाणी हजर होण्याचे पत्र दिले आहे.

तालुक्यातील बानेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेवर नियुक्ती झालेल्या अश्विनी रमेश मोरे या सहशिक्षिका परळी येथून येणे जाणे करतात. बानेगाव हे पाथरीपासून २० किलोमीटर असल्याने मोरे यांनी परळी - पाथरी रस्त्यावरील लिंबा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत अध्ययन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, बानेगाव शाळेत त्यांची रोजच असणारी अनुपस्थिती व विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने गावकऱ्यांनी शिक्षण विभागात १५ मार्च रोजी तक्रार केली. यावेळी हा भलताच प्रकार समोर आला.

अश्विनी मोरे या जाणे येणे सोईचे व्हावे, यासाठी लिंबा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवत असल्याचा प्रकार समोर आला. या बाबत गटशिक्षणाधिकारी यांनीच लिंबा शाळेत शिकवण्याचे तोंडी आदेश दिल्याची तक्रार बानेगाव ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.

Parbhani News
Sambhaji Nagar Crime : अनैतिक संबंधातून निलंबित कॉन्स्टेबलच्या पतीने काढला उद्याेजक सचिन नरोडेचा काटा

मराठी माध्यमाच्या शिक्षिका उर्दू शाळेवर तेही तोंडी आदेशाने पाच महिन्यापासून कशा शिकवतात? याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान गटशिक्षण अधिकारी शिवाजी गित्ते यांनी अश्विनी मोरे यांना त्यांच्या नियुक्ती असलेल्या बानेगाव शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे. एक शिक्षिका नियुक्ती दिलेल्या शाळेत न जाता दुसऱ्याच शाळेत अध्यापनासाठी जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या विषयाची सत्यता पडताळून संबंधित शिक्षिकेस नियुक्ती दिलेल्या शाळेतच जाण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

- शिवाजी गित्ते, गटशिक्षण अधिकारी, पाथरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com