सिंचनासाठी पाणी नियोजनास मान्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

नांदेड : सिंचनासाठी यंदा उर्ध्व पैनगंगा (इसापूर) प्रकल्पातून रब्बीसाठी दोन तर उन्हाळी हंगामासाठी चार अशा सहा पाणी पाळ्या मिळणार आहेत. योबतच विष्णुपुरीमधून तीन, पूर्णा प्रकल्पातून पाच तर निम्न मानार (बारुळ) प्रकल्पातून चार पाणीपाळ्या देण्यासाठी कालवा सल्लागार समितीत मंजुरी मिळाल्याची माहिती पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित

नांदेड : सिंचनासाठी यंदा उर्ध्व पैनगंगा (इसापूर) प्रकल्पातून रब्बीसाठी दोन तर उन्हाळी हंगामासाठी चार अशा सहा पाणी पाळ्या मिळणार आहेत. योबतच विष्णुपुरीमधून तीन, पूर्णा प्रकल्पातून पाच तर निम्न मानार (बारुळ) प्रकल्पातून चार पाणीपाळ्या देण्यासाठी कालवा सल्लागार समितीत मंजुरी मिळाल्याची माहिती पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. पी. कोहीरकर, मुख्य अभियंता ए. पी. आवाड, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सबीनवार, डी. एम. सुर्यवंशी, एम. आर. उपलवाड यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा......कृषी विभागावर रिक्तपदांचा ताण

एक लाख सिंचनक्षेत्र 
यावेळी श्री चव्हाण म्हणाले की नांदेडसह परभणी, हिंगाेली व यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख सिंचनक्षेत्र असलेल्या उर्ध्व पैनगंगा (इसापूर) प्रकल्पातून पिण्याचे आरक्षण वगळता यंदा 548 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. यातून 80 हजार हेक्टरवरील पिकांसाठी पाणी मिळणार आहे. यात रब्बीसाठी ता. 23 डिसेंबर रोजी एक पाणीपाळी सोडण्यात आली तर ता. 22 जानेवारी रोजी दुसरी पाणीपाळी मिळणार आहे. उन्हाळी हंगामासाठी चार (ता. एक मार्च, ता. दोन एप्रील, ता. पाच मे व ता. दहा जून) अशा सहा पाणी पाळ्या मिळणार आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे....आता हिंगोलीत स्वतंत्र एफएम केंद्राला मंजुरी

पूर्णा प्रकल्प व मानारमधून मिळणार पाणी
पूर्णा प्रकल्पात येलदरी व सिद्धेश्वर या दोन धरणातून पिण्याचे पाणी वगळता 96 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. यातून 55 हजार सिंचन क्षेत्रासाठी रब्बीत दोन (ता. 23 डिसेंबर व ता. 27 जानेवारी) तर उन्हाळी हंगामात तीन (ता. तीन मार्च, ता. तीन एप्रील, ता. तीन मे) पाणीपाळ्या मिळणार आहेत. निम्न मानार (बारुळ) प्रकल्पातुन यंदा 90.11 दशलक्ष घनमीटर पाणी 23 हजार हेक्टर सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. यातून रब्बीसाठी तीन (ता. 12 डिसेंबर व ता. 20 जानेवारी व ता. 20 फेब्रुवारी) तर उन्हाळी हंगामासाठी ता. 23 मार्च रोजी एक पाणीपाळी सोडण्यात येणार आहे.

विष्णुपुरीचे तीन पाणी मिळणार
नांदेड शहराजवळील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात यंदा 80.89 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. यासोबतच अंतेश्वर बंधाऱ्यातून 21 दलघमी व परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून 25 दलघमी असे एकूण 126.79 दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. यातून यंदा रब्बी हंगामासाठी तीन पाणीपाळ्या देण्यात येणार आहेत. यापूर्वी ता. 25 डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. यानंतर ता. 25 जानेवारी व ता. 20 फेब्रुवारी रोजी दोन अशा एकूण तीन पाणीपाळ्या देण्यात येणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval of water planning for irrigation