Hingoli Robbery : घोरदरीत बंदुकीचा धाक दाखवून सात लाखांची घरफोडी; हिंगोली येथील घटना
Knife Attack : हिंगोली जिल्ह्यातील घोरदरी गावात पहाटेच्या सुमारास चार सशस्त्र चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात घुसून बंदूक व चाकूचा धाक दाखवला. झटापटीत शेतकऱ्याचा मुलगा जखमी झाला आणि सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला.
हिंगोली : ‘आवाज केलास तर ठार मारून टाकू, पेटीची चावी द्या’, अशी धमकी देत, बंदूक, चाकूचा धाक दाखवून चोट्यांनी शेतकऱ्याच्या घरातून सात लाखांचा ऐवज लंपास केला. यावेळी झालेल्या झटापटीत शेतकऱ्याचा मुलगा जखमी झाला.