बीड : तरुणीवर अत्याचार करणाऱ्या सैनिकास कोठडी

प्रकाश काळे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

तरुणीचे आईवडील शेतात गेल्याचे पाहून तिच्यावर राहत्या घरी सैनिकाने केला अत्याचार. 

किल्ले धारुर : तरुणीचे आईवडील शेतात गेल्याचे पाहून तिच्यावर राहत्या घरी सैनिकाने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील भोगलवाडी येथे मंगळवारी (ता. आठ) घडली. या प्रकरणी कोठारबन (ता. वडवणी) येथील सैनिक संतोष बाबासाहेब मुंडे यांच्याविराधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली.

वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील सैनिक संतोष मुंडे यांची मावशी भोगलवाडी येथे असल्याने तो नेहमी तेथे जात होता. येथील एका तरूणीच्या आई-वडिलाची त्याची ओळख झाली. सोमवारी (ता. सात) तो मावशीकडे आल्याचे निमित्त करूण तरूणीच्या घरी गेला. या वेळी तिचे आई-वडील शेतात गेल्याचे समजताच एकटी पाहून सैनिकाने तिच्यावर आत्याचार केला. त्यानंतर तिला दुचाकीवर घेवून निघाला. या वेळी तरूणीने आरडाओरड करताच भोगलवाडी ग्रामस्थ धावून आले.

ग्रामस्थांनी संतोष मुंडे यास चांगलाच चोप दिला. तरूणीचे आईवडील आल्यानंतर सर्व प्रकार समजला. तरूने दिलेल्या फिर्यादीवरून धारूर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला. संतोष मुंडे यास न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Person Arrested in Case of Harassment of a Girl