मोगरा शेतीतून उत्पन्नाचा सुगंधी मार्ग

mogra.jpg
mogra.jpg
Updated on


वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः निसर्गाच्या बदलत्या ऋतूचक्रामुळे बागायतदार शेतकरी पारंपरिक पीक घेण्याऐवजी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या फुलशेतीकडे मोठ्या संख्येने वळला आहे. कमी खर्च व अधिक उत्पादन देणाऱ्या सुगंधी फुलउत्पादक शेतकरी आसमानी व सुलतानी संकटाच्या सावटातदेखील बऱ्यापैकी उभा राहिला होता. त्यातही सुगंधी मोगरा फुलपिकाची तर ‘बातच ओर’. लग्न समारंभ असू देत किंवा इतर कुठलेही औचित्य मोगरा फुलांची मागणी कायमच. नांदेड जिल्ह्याच्या माहूर किनवट तालुक्याच्या टोकाला तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात मोगरा फुलांची प्रचंड मागणी मराठवाड्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित मोठी कृषी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी होती. मात्र, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे लग्न समारंभ, सार्वजनिक सण, उत्सव अनिश्चित कालावधीपर्यंत रद्द झाल्याने त्याचा प्रचंड फटका वाई बाजार परिसरासह माहूर तालुक्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

नागरिकांच्या हितार्थ निर्णय
जगभरासह महाराष्ट्र राज्यात वेगाने फोफावत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी नागरिकांच्या हितार्थ शासन सर्वतोपरी कठोरातील कठोर निर्णय घेत आहे. कलम १४४ जमाबंदी आदेश, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायदा प्रभावीरीत्या अमलात आणत आहे. यामुळे सार्वजनिक प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली, सार्वजनिक कार्यक्रम सण-उत्सवांसह मार्च, एप्रिल, मे व जूनचे मुहूर्त ठरलेले लग्न समारंभदेखील लॉकडाउन संचारबंदीमुळे अनिश्‍चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा बंद या व इतर कारणांमुळे फुलउत्पादक शेतकऱ्यांची बाजारपेठ बंद झाली. फुलांची मागणी घटली. त्याचा जबर फटका तालुक्यातील फुलउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फुल शेतमालाला बाजारपेठेत घेवाल उपलब्ध नसल्याने देवी दिकांच्या पूजा आणि मनुष्य जन्मापासून मरणापर्यंतच्या व नंतरच्या अनेक विधीत मागणी असणाऱ्या फुलांची मागणी नकोशी झाली आहे.


उपासमारीची वेळ येण्याची भीती
वाई बाजार येथील वृद्ध महिला शेतकरी शहेजाद बी सांगतात की, ४० गुंठे इतक्या जमिनीच्या तुकड्यात मागील दहा वर्षांपासून मोगऱ्याची सुगंधित फुलशेती सुरू केली आहे. दरवर्षी लग्न सराईत ६० ते ७० हजार रुपयांचे उत्पादन मिळत होते. परंतु, या वर्षी मात्र मोगरा फुलांच्या झाडांची रखरखाव करण्याचा खर्चदेखील निघणे दुरापास्त झाले आहे. रात्रीच्या चंद्र प्रकाशात आकाशातील ताऱ्याप्रमाणे टिमटिमनारे सुगंधी मोगऱ्याचे फुले सकाळी उठून तोडून फेकावे लागते तेव्हा मात्र, जीव कासावीस होतो. एकंदरीत पूर्णतः फुलशेतीवर अवलंबून असलेल्या तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांनी दुसरे उत्पादन घेणे जवळपास बंदच केले आहे. सध्या शासनाने लॉकडाउन घोषित केले आहे. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर उत्पन्नाचे दुसरे कुठलेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ताळेबंदमुळे यंदा लग्नसराईचे मुहूर्त थांबविण्यात आले. मोगरा फुलांची मागणी दर्गा शरीफ, मंदिर व पूजा पाठ ऐवजी लग्नसमारंभात अधिक असते. ४० गुंठे जमिनीच्या तुकड्यात वर्षभर पुरेल इतके उत्पन्न सुगंधी मोगरा फुलशेतीतून मिळते. यंदा मोगरा पिकाचा बहारदेखील चांगला होता. परंतु, घेणारेच उपलब्ध नसल्याने फुले तोडून फेकण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने माझ्या सारख्या अतिअल्पभूधारक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाच्या महसूल व कृषी विभागाने फळबाग शेतीच्या धरतीवर फुलबाग शेतीलादेखील आर्थिक अनुदान द्यावे.
- शहेजाद बी शेख यासीन, शेतकरी, वाई बाजार, ता. माहूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com