केज - सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटला तरी या घटनेतील उर्वरित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १७) रात्री मस्साजोग गावातून कँडल मार्च काढला.