पाऊस म्हटला की ‘चातक’ आलाच ! , नेमगिरीत बनले पर्यटकांचे आकर्षण

गणेश पांडे
Sunday, 14 June 2020

पी-पी-पियू, पी-पी-पियू, असा  धातूसारखा खणखणणारा आवाज काढून एकमेकांचा पाठलाग करणारे चातक भर पावसात बघायला मिळतात. त्यामुळेच चातक आणि पाऊस हे एक समीकरण आहे. संत वाङ्मयातील चातक पक्ष्याविषयी येणारे अभंग पाहत असताना आपल्याला संताच्या जीवनातील सर्वच महत्वपूर्ण घटनांची ओळख होते. सध्या परभणी जिल्ह्यातील नेमगिरी (ता.जिंतूर) येथे त्याचे आमगन झाले असून पर्यटक त्याला पाहण्यासाठी येत आहेत.

परभणी : जिंतूर तालुक्यातील नेमगिरी (जि.परभणी) परिसरात चातक पक्षाचा आगमन झाले असून हा पक्षी सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पक्षी निरीक्षक अनिल उरटवाड यांनी या पक्षाचे निरीक्षण नोंदवले आहे आहे.
पावसाळा म्हटलं की, चातकाचे आगमन होणारचं. आफ्रीका, युरोपातून स्थलांतर करुन पावसाळ्याच्या तोंडावर येऊन संपूर्ण भारत भर विखुरले जातात. चातक आणि पाऊस हे एक समीकरण आहे. चातक हा पक्षी कोकिळेच्या जात कुळातील असल्यामुळे तो ही घरटे बनवत नाही. तो जंगलातील इतर पक्ष्यांच्या  घरट्यातील त्यांची अंडी ढकलुन खाली पाडुन देतो आणि त्या ठिकाणी स्वता : ची अंडी घालतो. 
प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितामध्ये याचे वैशिष्टये म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवते असे आहे. अर्थात हा एक गैरसमज आहे.

हेही वाचा : अधिकचे पैसे दिल्याशिवाय मिळेनात खत, बियाणे !
 

संत वाङ्मयात ‘चातक’ पक्षावर काव्य

 चातक हा पक्षी जमिनीवर साठलेले पाणी सुध्दा पितो. पी-पी-पियू, पी-पी-पियू, असा आवाज काढतो. संत वाङ्मयातील चातक पक्ष्याविषयी येणारे अभंग पाहत असताना आपल्याला संताच्या जीवनातील सर्वच महत्वपूर्ण घटनांची ओळख होते. संत महात्मे जेव्हा ज्ञानप्राप्ती, ध्यान साधनेसाठी जंगलात आपला काही काळ घालवत असे त्यावेळी चातक त्यांना साथ देत असत. चातक मेघाशिवाय इतर जल प्रकाराकडे पाहत नाही, असे संत तुकाराम म्हणतात, संत तुकाराम गाथेत याच आशयाचा आणिक एक अभंग येतो.

‘वाट पाहे मेघा बिंदू ।
नेघे चातक सरिता सिंधू ॥’
पावसाच्या थेंबांना मेघाबिंदू आणि जीवनदायी मेघाला प्राणमेघ अशी विलोभनीय संबोधने संत तुकाराम महारांनी केलेली आहेत.

हेही वाचा : ‘या’ जिल्ह्यात वार्षीक सरासरीच्या ९ टक्के पाऊस
 

पक्ष्यांचा मुक्त संचार
वसंत ऋतु आणि चैत्राची पालवी फुलताच पक्ष्यांचा कंठ फुटतो. पावसाळयात वैशाख महिन्यात घरटे बांधण्यासाठी सुरवात करतात. ज्येष्ठात प्रजनन सुरु करुन अंडी घालण्याच काम करतात. सध्या शहरात पक्ष्यांचा मुक्त संचार दिसुन येत आहे. पहाटेच्या वेळी हा किलकिलाट अधिकच जाणवतो.
- अनिल उरटवाड, पक्षीमित्र, परभणी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of the Chatak party with the rain Parbhani News