मला राजकारणातून संपविण्याचा डाव : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

अशोक चव्हाण आहे म्हणून काँग्रेस चांगली चाललेली आहे. शरद पवार संपले, की राष्ट्रवादी संपेल, अजित पवार संपले की राष्ट्रवादी संपेल अशा पध्दतीचं राजकारण भाजप करत असल्याची घणाघाती टिका चव्हांणांनी केली आहे.

नांदेड : पंतप्रधान मोदींच माझ्यावर विशेष प्रेम असल्याची उपहासात्मक टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. राजकारणातून मला संपवण्याचं षडयंत्र चालू असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण आहे म्हणून काँग्रेस चांगली चाललेली आहे. शरद पवार संपले, की राष्ट्रवादी संपेल, अजित पवार संपले की राष्ट्रवादी संपेल अशा पध्दतीचं राजकारण भाजप करत असल्याची घणाघाती टिका चव्हांणांनी केली आहे. चव्हाण यांनी भोकरमध्ये भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

अशोक चव्हाणांची पेपरमध्ये ओळ ही छापाईची नाही आणि चॅनल्सवर चव्हाणांचा फोटो जास्तवेळ न दाखवता कट करायचा. अशा पध्दतीचा दबाव पत्रकारांवर मालकाकडून आणल्या जात असल्याची टीका चव्हाणांनी भाजपवर केली. प्रिंट आणि ईलेक्ट्रॉनिक मिडीयाला अशोक चव्हाण बद्दल लिहू नका, दाखवू नका अशा पध्दतीचा भाजप दबाव आणत असल्याची टीका चव्हाणांनी भोकरमध्ये प्रचार सभेत बोलताना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan attacks BJP in Nanded rally