Vidhan Sabha 2019 : अशोक चव्हाण यांनी पत्नी अमिता यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

आमदार अमिता चव्हाण यांना पावसाचा फटका

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. नांदेड उत्तर मतदारसंघातील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी पावसामुळे परिसरात चिखल आणि पाणी साचल्याने अशोक चव्हाण गाडीत बसून केंद्रापर्यंत यावे लागले. 

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर पावसामुळे मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच पावसामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत वाहने आणण्याची परवानगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी निवडणूक आयोगाला केलं. ईव्हीएम मशीनमध्ये तीन चार ठिकाणी बिघाडीची माहिती आल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

आमदार अमिता चव्हाण यांना पावसाचा फटका

नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका अशोक चव्हाण यांच्यासह पत्नी अमिता चव्हाण आणि मुलीलाही बसला. मतदान केंद्रावर आल्यानंतर साचलेल्या चिखलपाण्यातून वाट काढत अमिता चव्हाण मुलीसह मतदान केंद्रात पोहचल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan Voted with his Wife Amita Chavan Maharashtra Vidhan Sabha 2019