

"No job in hand despite 118 exams; Graduate's anger at Mahayuti rally
Sakal
बीड : "अनेक परीक्षा दिल्या, वयाची तिशी उलटली तरी हाताला नोकरी नाही. नोकरी नसल्याने लग्नही जमत नाही. त्यामुळे अण्णा, एकतर आमच्या लग्नाचं बघा, नाहीतर लग्न होईपर्यंत दरमहा मानधन द्या," अशी भावनिक साद आष्टी येथील प्रचारसभेत एका उच्चशिक्षित पदवीधर तरुणाने थेट व्यासपीठावरून आमदार सुरेश धस यांच्याकडे घातली.