esakal | घरफोडी प्रकरणातील आरोपीला आष्टी पोलिसांनी केले जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

घरफोडी प्रकरणातील आरोपीला आष्टी पोलिसांनी केले जेरबंद

sakal_logo
By
निसार शेख

आष्टी : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना घडत असून चोरांना पकडण्यासाठी आष्टी पोलीस (Police) शोध घेत असतानाच निंबोडी (Nimbodi) येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला गुरुवारी सायंकाळी आष्टीAshti) पोलिसांनी जेरबंद केले. आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील गर्जे वस्तीवर रविवारी मध्यरात्री नवनाथ गर्जे (Navnath Garje) यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना घरातील सोने (Gold), मोबाईल (Mobile) व रोख रक्कम (Cash) असा ७० हजारांचा ऐवज चोरीला गेल्या प्रकरणी नवनाथ गर्जे (Navnath Garje) यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात(Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: सिध्देश्वर निंबोडी येथे सुप्रिया सुळे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी घरफोड्याचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत होते परंतु सदरील आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत होते.

निंबोडी घरफोडी प्रकरणाचा तपास आष्टी पोलिस करत असतानाच या प्रकरणातील आरोपी हा कडा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, पोलिस शिपाई मंगेश मिसाळ, बंडु दुधाळ यांनी गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संतोष उर्फ बलमा जायभाय याला शिताफीने जेरबंद केले. सदरील पकडलेल्या आरोपीकडून आष्टी तालुक्यात झालेल्या घरफोड्या प्रकरणी पोलिसांना तपास कार्यात मदत होऊ शकते.

loading image
go to top