esakal | एकावे ते नवलच : रस्ता दुरुस्ती दाखवण्यासाठी डांबरी रस्ताच उखडून टाकला....

बोलून बातमी शोधा

file photo

रेल्वे स्टेशन ते सती पांगरा रस्त्याची अवस्था, शेतकरी नागरिकांनी केले काम बंद, तहसीलदारांना निवेदन

एकावे ते नवलच : रस्ता दुरुस्ती दाखवण्यासाठी डांबरी रस्ताच उखडून टाकला....
sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली) : रस्त्याची दुरुस्ती दाखविण्यासाठी चक्क गुत्तेदाराने रेल्वे स्टेशन ते सती पांगरा हा डांबरी रस्ताच जेसीबी मशीनद्वारे उघडून टाकण्याचा पराक्रम केला असल्याची तक्रार परिसरातील शेतकरी व नागरीकांनी सोमवारी (ता. १२) तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान  शेतकऱ्यांनी कामाचे अंदाजपत्रक व प्रशासकीय मंजुरीचे पत्र दाखवत नाही तोपर्यंत काम करु देणार नाही असा पवित्रा घेतला.

याबाबत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार वसमत रेल्वे स्टेशन ते सती पांगरा जाणारा रस्ता डांबरीकरणाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वसमत शिवारातील शेती मोठ्या प्रमाणावर आहे. शेतीमधील कच्चामाल व पक्का माल या रस्त्याद्वारे वसमत येथे येतो. दरम्यान एका गुत्तेदारने सदरील रस्त्याच्या डागडूगीचे काम हाती घेतले आहे. किरकोळ दुरुस्तीचे काम असताना गुत्तेदारने मात्र मोठ्याप्रमाणावर रस्ता दुरुस्ती दाखविण्यासाठी चांगला डांबरी रस्ता उखडूनन टाकला असल्याचा आरोप परिसरातील शेतकरी व नागरिकांनी करुन सदरील काम बंद केले आहे. 

हेही वाचा - नांदेडकरांनो...विनाकारण रस्त्यावर फिरून जीव धोक्यात घालू नका - विशेष पोलिस महानिरीक्षक तांबोळी

त्याबरोबरच उखडलेल्या रस्त्यावर ढबर व रस्त्याच्या बाजूची काळी माती टाकून रस्त्याचे कच्चे बांधकाम करण्यात येत आहे. चांगल्या स्थितीतील डांबरी रस्ता जेसीबी मशीन द्वारे उखडून तो दुरुस्तीच्या नावाने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. जोपर्यंत सदरील रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक व कामाच्या मंजुरीचे पत्र दाखवण्यात येत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नाही असेही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर गोविंद क्षीरसागर, बालाजी कवठेकर, बालाजी नान्हाळे, नामदेव चीतलवार, प्रल्हाद क्षीरसागर, खंडोजी चीटकलवार, परसराम लिंगडे, गोविंद जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

संपादन- प्रल्हाद कांबळे