परळीत पत्रकारासह कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. संभाजी मुंडे यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले असून, त्यांचा मुलगा विष्णू मुंडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) - येथील पत्रकार संभाजी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर सोमवारी (ता.११) रात्री आठच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत संभाजी मुंडे यांच्यासह मुलगा विष्णू आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले आहेत.

सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला केला आहे. संभाजी मुंडे यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आले असून, त्यांचा मुलगा विष्णू मुंडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. संभाजी मुंडे व त्यांना पत्नीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्राणघातक हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्यासंदर्भात पोलिस माहिती घेत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मागील दोन महिन्यांत येथे पत्रकारांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault on family members, including a journalist in Parli