सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी झाले उपजिल्हाधिकारी

Assistant Regional Transport Officer becomes Deputy Collector
Assistant Regional Transport Officer becomes Deputy Collector

औरंगाबाद : येथील आरटीओ कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश लाहोटी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत सातव्या रॅंकने उतीर्ण झाले. त्याची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. 

राज्य परिवहन महामंडळातील (बीड) निवृत्त वाहतूक नियंत्रक श्रीनिवास लाहोटी व मदनलाल सारडा प्रा. राजस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लीला लाहोटी यांचे ते सुपुत्र आहेत. शैलेश हे सध्या औरंगाबादेत कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सारडा राजस्थानी विद्यालयात, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे. त्यांनी मुंबईतून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. आरटीओ कर्मचार्‍यांच्या वतीने शहरात शैलेश लाहोटी यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com