‘झेडपी’च्या शाळेत घडणार खगोलशास्त्र अभ्यासक, कुठे ते वाचा? 

file photo
file photo

नांदेड - शालेय अभ्यासक्रमात खगोलशास्त्रातील आवडीच्या वस्तूंमध्ये ग्रह, चंद्र, तारे, निहारिका, आकाशगंगेचे विद्यार्थ्यांना परिक्षण करता यावे, आकाशातील भावनाविश्व प्रत्यक्ष डोळ्यात टिपून खगोलशास्त्राची आवड निर्माण होऊन त्यांच्या कौशल्य गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्ह्यातील नऊ जिल्हा परिषद शाळांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दुर्बिण भेट दिल्या आहेत.

खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सोमवारी (ता. १७) पाटणूर (ता.अर्धापुर) येथील राखीव वनक्षेत्रातील श्रीक्षेत्र अपरंपार देवस्थान परिसरात रात्री आकाशगंगेचे मानवी जीवनाशी महत्व पटवून दिले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शाळांना दुर्बिण भेट देण्यात आल्या. या मध्ये जिल्हा परिषदेच्या विष्णुपुरी, वडेपुरी, मुखेड, करडखेड, बारड, तामसा, इस्लापूर, कामारी, कुटुंर येथील शाळांचा समावेश आहे.

शिक्षकांना दुर्बिण हाताळण्यासह आकाशगंगेतील ग्रह, चंद्र, तारे, निहारिकांची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी सोमवारी पाटणूर येथील अपरंपार देवस्थान परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सौ. काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, बंडू आमदूरकर यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ मुख्याध्यापक, शिक्षकांना खगोलशास्त्र अभ्यासक श्री. औंधकर यांनी नवमीच्या रात्री आकाशातील लखलटामधील ग्रह, ताऱ्यांची माहिती पटवून दिली. 
 
हेही वाचा‘यासाठी’ तीन दिवसांत काढले सोळा आदेश

कॉसमोलॉजी खगोलशास्त्राएक शाखा 
खगोलशास्त्र एक नैसर्गिक विज्ञान आहे ज्याने आकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास केला आहे. हे गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र वापरुन त्यांचे मूळ व उत्क्रांती प्रयत्न करतात. आवडीच्या वस्तूंमध्ये ग्रह, चंद्र, तारे, निहारिका, आकाशगंगा आणि धूमकेतूंचा समावेश आहे. संबंध घटनेत सुपरनोवा स्फोट, गामा रे स्फोट, क्वासर, ब्लेझर, पल्सर आणि कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी विकिरण. सामान्यत: खगोलशास्त्र पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उद्भवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. कॉसमोलॉजी ही खगोलशास्त्राची एक शाखा आहे, संपूर्ण विश्वाचा अभ्यास करते.

अकाशाचे पद्धतशीर निरीक्षण
श्रीक्षेत्र अपरंपार देवस्थान परिसरात ठिकठकाणी दुर्बीण स्थानबद्ध करुन उपस्थितांनी रात्रीच्या आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण केले. खगोलशास्त्र निरीक्षणासंबंधी आणि सैद्धांतिक शाखांमध्ये विभागले गेले आहे. पर्यवेक्षण खगोलशास्त्र खगोलशास्त्रीय वस्तूंच्या निरीक्षणावरील डेटा मिळविण्यावर केंद्रित आहे. भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्वे वापरून या डेटाचे विश्लेषण केले जाते.

सैद्धांतिक खगोलशास्त्र खगोलशास्त्रीय वस्तू आणि घटनेचे वर्णन करण्यासाठी संगणक किंवा विश्लेषणात्मक मॉडेल्सच्या विकासाकडे केंद्रीत आहे. ही दोन फिल्ड एकमेकांना पूरक आहेत. सैद्धांतिक खगोलशास्त्र निरीक्षणासंबंधी निकाल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि निरीक्षणे सैद्धांतिक परिणामाची पुष्टी करण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

रंंगीत ताऱ्यांचे मोहक चित्र 
अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि प्लाझ्माचा बनलेल्या चमकत्या गोलाला तारा असे म्हटले जाते. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा आहे. रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व हवा स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात.

दुर्बिण मिळाल्याचे समाधान 
ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश सेल्सिअस असले तरी त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान काही हजार अंश सेल्सिअस इतके असते. या तापमानानुसारच ताऱ्यांना रंग प्राप्त होत असल्याचे सचित्र त्यांनी दाखवले. जिल्हा परिषद शाळांना दुर्बिण भेट मिळाल्याने आता शाळास्तरावर विद्यार्थी प्रत्यक्ष खगोलशास्त्राचे अवलोकन करणार असल्याचे समाधान यावेळी त्यांनी व्यक्त केले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com