esakal | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Woman

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परतूर : लग्न करण्याचे आमिष दाखवून रेणापूर येथील युवतीवर वर्ष २०१८ पासून युवकाने सातत्याने अत्याचार केला. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका युवतीसोबत (वय २०) संशयित अनिल रामराव धुमाळ याने मोबाइल फोनवर ओळख वाढविली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी या युवतीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर युवतीने लग्नाचा तगादा लावल्यावर हा प्रकार कुणाला सांगितला तर फोटो सोशल मिडियावर व्हायरल करेल, तुझ्या नातेवाइकांना दाखवील, अशी धमकी अनिल याने दिली, तसेच जातिवाचक शिविगाळही केली. त्यामुळे याबाबत परतूर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.१५) दुपारी चार वाजता गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे व पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी तपासाचे सूत्र हलविली, तसेच अवघ्या दोन तासामध्ये तालुक्यातील शेवगा येथून अनिल धुमाळ यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विजय गट्टूवार, सुनील होडे, इस्माईल शेख,संजय वैद्य आदींनी केली. पुढील तपास राजू मोरे करीत आहेत.

loading image
go to top