Vidhan Sabha 2019 : नांदेडमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक

संतोष जोशी
Monday, 21 October 2019

जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या जीपवर अज्ञातांनी दगडफेक केली.

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या जीपवर अज्ञातांनी दगडफेक केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी घडली.  

हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत जीपच्या काचा फुटल्या. या हल्ल्यात जीपमध्ये उमेदवार भरांडे होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत. दगडफेकीची घटना ही आंतापूर गावाजवळ घडली. याप्रकरणी प्रा.भरांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

दरम्यान, दगडफेक करणारे घटनास्थळावरून पळून गेले असल्याची माहिती प्रा. भरांडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on VBA Candidate Ramchandra Bharandes Car in Nanded Maharashtra Vidhan Sabha 2019