गेवराई तालुक्यात तलावाला पाडले भगदाड, ग्रामस्थ संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गेवराई (जि.बीड) -तालुक्यातील गोविंदवाडी येथील पाझर तलावाच्या भिंतीला अज्ञात व्यक्तीने फोडून देण्याच्या उद्देशाने भगदाड पडले आहे.

गेवराई तालुक्यात तलावाला पाडले भगदाड, ग्रामस्थ संतापले

गेवराई (जि.बीड) - तालुक्यातील (Gevrai) गोविंदवाडी येथील पाझर तलावाच्या भिंतीला अज्ञात व्यक्तीने फोडून देण्याच्या उद्देशाने भगदाड पडले आहे. यामुळे पाझर तलावातील पाण्यासह तलावाखालील शेत जमिनीला धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी तलावावर गर्दी करत भिंत फोडणाऱ्यावर कारवाही करा अशी मागणी केली आहे. तालुक्यात मागील दहा दिवसांत धो-धो पाऊस (Rain) पडला असून पाणी पातळी वाढली आहे. पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून तालुक्यातील सात तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. तर अनेक तलाव पूर्ण भरल्यानी (Beed) अजून पाऊस पडला तर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच तालुक्यातील गोविंदवाडी तरफ तलवाडा येथील पाझर तलाव पाण्याने पूर्ण भरलेला असताना तलावाची भिंत (पिचिंग)फोडण्याचा प्रयत्न येथील अज्ञात व्यक्तीने केला आहे.

या भिंतीला मोठे फगदाड पडले असून पाणीपातळी वाढल्यास हा तलाव फुटण्याची शक्यता आहे. याची माहिती गोविंदवाडी ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिली असून तलाठी यांनी पंचनामा केला आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाझर तलाव फुटल्यास तलावाखालील शेत जमिनीचे नुकसान होणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी तलावावर गर्दी करत फोडलेला तलाव बुजण्यात यावा तसेच अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Beed