
हिंगोली : शहरातील तिरुपतीनगर भागात गुरुवारी (ता.२१) दुपारी घरात शिरलेल्या एका चोरट्याने खंजरचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मुलगा घरात आल्याने त्याची चोरट्यांसोबत झटापट झाली. त्यानंतर चोरटे दुचाकीवर पळून गेले. यावेळी झटापटीत मुलाच्या मानेवर खंजर लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.