
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएम आणि भाजपमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत अखेरच्या फेरीत भाजपच्या अतुल सावे यांनी २,१६१ मतांनी विजय मिळवला. इम्तियाज जलील यांनी घेतलेली लीड तोडण्यासाठी सावे यांच्यासाठी २१ वी फेरी निर्णायक ठरली. या फेरीत सावे यांनी साडेतीन हजार मतांची आघाडी घेतली.