Financial Fraud : ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या ठेवीदारांचा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना रोड शाखेतील ठेवींचा पैसा कुटे आणि तिरुमला उद्योग समूहाच्या कर्जात वळविला गेला. लेखापरीक्षकांनी यावर लक्ष दिले नसल्यामुळे ठेवीदारांना मोठा फटका बसला आहे.
बीड : ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटी’च्या राज्यभरातील सर्व शाखांचा बहुतांशी ठेवींचा पैसा येथील जालना रोड शाखेत वळवून कुटे व तिरुमला उद्योग समूहाच्या विविध उद्योगांना अब्जावधींचे कर्ज घेतले गेले.