esakal | Aundha Nagnath: शेवटच्या श्रावण सोमवारी आमदार बांगर यांच्या हस्ते महापुजा
sakal

बोलून बातमी शोधा

Aundha Nagnath

Aundha Nagnath: शेवटच्या श्रावण सोमवारी आमदार बांगर यांच्या हस्ते महापुजा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-दतात्रय शेगुकर

औंढा नागनाथ (हिंगोली): बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारूकावन देवाची श्रावणातील पाचव्या व शेवटच्या सोमवारची महापुजा पार पडली. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सहा वाजता दुग्धाभिषेक करून महापुजा झाली. यावेळी त्यांनी शेतकरी सुखी होओ, देशावरील कोरोनाचे संकट जाऊ दे व नागनाथ मंदिर पहिल्यासारखे सुरु होवो असे नागनाथ प्रभूस साकडे घातले. कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्यामुळे मंदिर परीसरात सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळाला.

शेवटच्या सोमवारी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सहा वाजता दुग्धाभिषेक करून महापुजा झाली

शेवटच्या सोमवारी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सहा वाजता दुग्धाभिषेक करून महापुजा झाली

महापुजेच्या वेळी नारायण भोपी, श्रीपाद भोपी, पद्माक्ष पाठक, जोशी महाराज, कृष्णा रुषी, जिवन रुषी, संजय पाठक, गणेश देव, रवि भोपी, दिना पाठक, आबागुरु बल्लाळ मनोहर भोपी, सचिन देव यांनी महाअभिषेकाचे आवर्तने म्हटली. यावेळी राजू गोरे, रामेश्वर शिरसागर, सहायक व्यवस्थापक बापुराव देशमुख, बबन सोनुने, कृष्णा पाटील यांच्यासह कर्मचारी होते.

औंढा पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनिल लांडगे, पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, जमादार अफसर पठाण, गजानन गिरी, शेख एकबाल यांनी मंदीर परिसरांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी देवस्थानचे अधिक्षक वैजनाथ पवारसह शिवसेना युवा जिल्हा सरचिटणीस मनोज देशमुख, रुग्ण कल्याण समिती सदस्य महादेव गोरे, प्रदुन्ननागरे, अभिषेक गोरे, दीपक सोनुने ,अविनाश जगदेवराव, प्रमोद देव शिवसेना कार्यकर्ते हजर होते. दरम्यान, दरवर्षी पोळ्याच्या दिवशी नागनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते, मात्र मागच्या वर्षी पासून कोरोनाचे संकट सुरू झाल्याने मंदिर बंद असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

loading image
go to top