
औंढा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
औंढा नागनाथ : तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे पिकांत पाणी जमा होऊन पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे. मागच्या आठवड्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परत पाऊस सुरू झाल्याने आता पुन्हा शेतातील कामे ठप्प झाली आहेत. गत आठवड्यात औंढा नागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात नदीकाठच्या परिसरात पूर परिस्थितीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नदीकाठच्या पिकांसह जमिनीचेही नुकसान झाले असले तरी उर्वरित भागात पिकांसाठी चांगला पाऊस झाला आहे. काही जणांना दुबार पेरणी करावी लागली आहे.
काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. उन्ह पडल्याने शेतातील कामे सुरू होऊन सर्व व्यवहार सुरळीत होत असताना पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पावसामुळे तालुक्यातील अनखळी पेरजाबाद, पोटा बुद्रुक, वाडी नांदखेडा, बेरुळा या भागामधील शेतात पावसामुळे विजेचे पोलही वाकले आहेत. या वाकलेल्या पोलची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Web Title: Aundha Taluka Double Sowing Crisis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..