axe attacksakal
मराठवाडा
Parli Vaijnath Crime : दारूसाठी पैसै न दिल्याने चुलतीची कुऱ्हाडीने केली हत्या
दारूसाठी पैसे का देत नाहीस, असे म्हणत पुतण्याने कुऱ्हाडीचे घाव घालून वृद्ध चुलतीची हत्या केल्याची घटना घडली.
सिरसाळा (ता. परळी वैजनाथ) - दारूसाठी पैसे का देत नाहीस, असे म्हणत पुतण्याने कुऱ्हाडीचे घाव घालून वृद्ध चुलतीची हत्या केल्याची घटना कावळ्याची वाडी (ता. परळी) गुरुवारी (ता. एक) सायंकाळी घडली. परीमाळाबाई भागूराम कावळे (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे.