Aurad Shahajani Market Shut Over Demand for Police Action
Sakal
मराठवाडा
Latur Protest : औराद शहाजनीत तरुणाच्या मृत्यू प्रकरणावर संताप; बाजारपेठ कडकडीत बंद; सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी!
Aurad Shahajani Market Closure : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे तरुणाच्या मृत्यू प्रकरणानंतर संतप्त नागरिक व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवत तीव्र निषेध नोंदवला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलक ठाम भूमिकेत आहेत.
निलंगा : निलंगा तालुक्यातील औरादशहाजनी येथे पोलिसांच्या कथित जाचाला कंटाळून एका तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण औराद शहाजनी परिसरात तणावाचं वातावरण असून, संतप्त व्यापाऱ्यांनी शुक्रवारी ता. 26 रोजी आपली दुकानं बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

