esakal | औरंगाबाद न्यायालय राज्यात पहिले, पण कशात? (जाणून घ्या)
sakal

बोलून बातमी शोधा

District Court Aurangabad News

ई-फायलिंगची या सुविधेची सुरवात ही राज्यामध्ये सर्वप्रथम दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, औरंगाबाद न्यायालयात, विधिज्ञ किशोर डी. अग्रवाल यांनी ऑनलाइन पद्धतीने (ई-फायलिंग) e-Filing या सुविधेच्या साहाय्याने दिवाणी दावा दाखल करून केलेली आहे. 

औरंगाबाद न्यायालय राज्यात पहिले, पण कशात? (जाणून घ्या)

sakal_logo
By
​ ​​​सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेवर; तसेच त्याअंतर्गत कार्यरत सर्व कनिष्ठ न्यायालयांत, तालुका न्यायालयांत दावे, प्रकरणे ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यासाठी ई-फायलिंगची सुविधा 20 डिसेंबर 2019 रोजीपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव एस. डी. इंदलकर यांनी दिली. 

हेही वाचा- तुम्ही हेलिकॉप्टर पालक आहात की मिलिटरी मॅन पालक? पहा वाचून -

ई-कमिटी सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी (कागदविरहित कामकाज) Paperless Office ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्याच्या दृष्टीने वकील, विधिज्ञांना ऑनलाइन पद्धतीने दावे, प्रकरणे दाखल करण्यासाठी ई-फायलिंग सुविधा सुरू केलेली आहे. त्यानुसार ई-कमिटी सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार या सुविधेची सुरवात ही राज्यामध्ये सर्वप्रथम दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, औरंगाबाद न्यायालयात, विधिज्ञ किशोर डी. अग्रवाल यांनी ऑनलाइन पद्धतीने (ई-फायलिंग) e-Filing या सुविधेच्या साहाय्याने दिवाणी दावा दाखल करून केलेली आहे. 

क्लिक करा- शंभर झाडांवरून काढले चार किलो खिळे : काय आहे वेदनामुक्त झाड अभियान?

अशी करा नोंदणी 
ऑनलाइन पद्धतीने दावे, प्रकरणे दाखल करण्यासाठी ई-फायलिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी वकील, विधिज्ञांनी https://efiling-mh.ecourts.gpv.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे; तसेच सदरील संकेतस्थळावर ई-फायलिंग करण्यासाठी कार्यपद्धतीचीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरील सुविधेचा वापर करून (कागदविरहित कामकाज) ही संपल्पना प्रत्यक्षात अमलात आणता येईल; तसेच वकील व पक्षकारांच्या वेळेची बचत होणार आहे. जास्तीत जास्त वकील/विधिज्ञांनी न्यायालयात ऑनलाइन पद्धतीने दावे, प्रकरणे दाखल करण्यासाठी ई-फायलिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी वरील संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे ई-फायलिंग सुविधा यशस्वीपणे कार्यरत करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख श्रीपाद द. टेकाळे, जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. भीष्मा, जिल्हा प्रणाली प्रशासक आर. के. लोसरवार यांनी विशेष परिश्रम घेतले. 

क्लिक कराअशोक चव्हाण यांना मिळणार मंत्रीमंडळात स्थान