Aurangabad: शरीरसुखाची मागणी करत विवाहितेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वाळूज : शरीरसुखाची मागणी करत विवाहितेचा विनयभंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : बळजबरीने घरात प्रवेश करून तू माझ्या मोबाईलचे नुकसान केले होते. त्याचे तीस हजार रुपये दे, असे म्हणून एका तरुणाने २९ वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केला. ही घटना बुधवारी (ता.१३) दुपारी घडली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील २९ वर्षीय विवाहिता दोन मुली व पतीसह राहते. बुधवारी दुपारी महिलेचा पती कंपनीत कामाला गेला होता तर ती, तिच्या दोन्ही मुली घरीच होत्या.

आरोपी अब्दुल समीर शहा (२९) रा. पवननगर, रांजणगाव (शेणपुंजी) हा तिच्या घरात बळजबरीने घुसला व म्हणाला की, तू माझ्या मोबाईलचे नुकसान केले होते. त्याचे तीस हजार रुपये दे नसता माझ्याशी संबंध ठेव. नंतर तिचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. जर पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

loading image
go to top