Vidhansabha election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात 28.90 टक्के मतदान (Video)

संदीप लांडगे
Monday, 21 October 2019

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी एकवाजेपर्यंत 28.90 टक्के मतदान झाले आहे. 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ढगाळ वातावरणामुळे काहीसा निरुत्साह दिसत होता. त्यामुळे सकाळच्या सत्रात फक्त 6 टक्केच मतदान झाले. त्यानंतर काहीसा वेग घेत दुसऱ्या सत्रात अकरा वाजेपर्यंत 11.60 टक्के मतदान झाले. तीसऱ्या टप्प्यात मतदानाची गती वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी एकवाजेपर्यंत 28.90 टक्के मतदान झाले आहे. 

पैठणमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वात अधिक असुन सकाळी दुसऱ्या फेरीत 14.30 टक्के तर एकवाजेपर्यंत ती आकडेवारी 38.03 वर पोहचली असुन जिल्हातील सर्वाधीक मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी मतदान वैजापूर मतदार संघात झाले आहे.

अकरा वाजेपर्यंत 11.2 टक्के तर एकवाजेपर्यंत केवळ 19.02 टक्केच मतदान झाले. कन्नड विधानसभा मतदार संघात दुसऱ्या सत्रात 13.23 टक्के तर एक वाजेपर्यंत तेच मतदान 33.45 मतदान झाले. फुलंब्री मतदार संघात दुसऱ्या फेरीत 13.72 टक्के मतदान होते तीसऱ्या फेरीत ते 33.42 टक्के मतदानाची नोंद झाली. 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा पर्यंत 14.22 टक्के तर एक वाजेपर्यंत 27.58 टक्के मतदान झाले. औरंगाबाद पुर्व मतदार संघात दुसऱ्या फेरीत 13.1 तर तीसऱ्या फेरीत 27.1 टक्के मतदान झाले. औरंगाबाद पश्‍चिम मध्ये दुसऱ्यता फेरीत 12.51 टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत 28.02 टक्के मतदानाची नोंद झाली.

सकाळच्या ढगाळ वातावरणानंतर दुपारच्या सत्रात बऱ्याच ठिकाणी ऊन पडल्याने मतदार बाहेर पडत आहेत. बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी मशिनला तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र, निवडणूक विभागाकडून त्वरीत मशिन बदलण्यात येत आहे. एकूणच संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत 28. 90 टक्के मतदान झाले आहे. अजून दोन फेऱ्या बाकी आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad district polls 28.90 percent