esakal | Aurangabad: ‘ड्राय डे’च्या दिवशी दारूचा ‘पाऊस’
sakal

बोलून बातमी शोधा

ड्राय डे

औरंगाबाद : ‘ड्राय डे’च्या दिवशी दारूचा ‘पाऊस’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात ‘ड्राय डे’ चे औचित्य साधून अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या दारू व्यवसायिकांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईअंतर्गत १७ दारू विक्रेत्यांकडून १८ हजार रुपये किमतीच्या तब्बल ३११ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर एका कारवाई पोलिसांना विदेशी दारूही जप्त करण्यात आली.

याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महेश बाळू शिंदे (रा. धामोरी) याला मुक्तेश्वर कारखान्याजवळ, तर नारायण वसंतराव खराडे (२६, रा. रेल्वे स्टेशन) याला देशी फाटा गंगापूर येथे दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. वेदांतनगर पोलिस ठाण्यांतर्गत राजीवनगर रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या खाली दारू विक्री करणाऱ्या एका महिलेसह संजय मारुती वानखेडे (रा. राजीवनगर) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: बालेवाडी : सतरा महिन्या नंतर वाजल्या शाळेच्या घंटा

तसेच उस्मानपुरा भागात मोहन लक्ष्मीनारायण मुत्याल (रा. भीमनगर व साठे चौक) येथे राहणारी एका महिलेला ताब्यात घेतले. सातारा परिसरातून सुभाष मंजुळराव पारखे (४२, रा. सातारा परिसर) याला दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. जवाहरनगर भागात भाऊसाहेब भीमराव सातपुते (३५, रा. शिवशंकर कॉलनी) याच्यासह जितेंद्र रणछोडदास वैष्णव (५४, रा. टिळकनगर) या पानटपरी चालकाला दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले आहे. छावणी भागात संजय जयवंत मकवाना (६०, रा. सुंदरनगर), शेखर राजू शिर्के (३२, रा. साठेचौक भीमनगर) आणि सतीष रमेश खंडागळे (२४, रा. भीमनगर) या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले आहे.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी नारेगाव येथे संतोष बन्सीलाल जैस्वाल (५१, रा. नारेगाव) याला दारू विक्री करताना अटक केली. पुंडलिकनगर पोलिसांनी सुनील गोरख काळे (२२, रा. आनंदनगर) याला ताब्यात घेतले. सिटीचौक पोलिसांनी पोचन्ना नागय्या पवार (६२, रा. चेलीपुरा), मुकुंदवाडी पोलिसांनी भारत आनंद रोकडे (४१, रा. प्रकाशनगर), बाजीराव कडुबा वाघ (२०, रा. मुकुंदवाडी) या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: सातारा : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या शिरला गावात

प्रत्येक ठाण्याची कारवाई

‘ड्राय डे’ च्या दिवशी छावणी पोलिसांनी ३, मुकुंदवाडी, वाळूज, वेदांतनगर, उस्मानपुरा, जवाहरनगर पोलिसांनी प्रत्येकी दोन, पुंडलिकनगर, एमआयडीसी सिडको, सिटीचौक आणि सातारा पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई जवाहरनगर पोलिसांनी पानटपरी चालक जितेंद्र वैष्णव याच्याकडून विदेशी दारू जप्त केली आहे.

loading image
go to top