Aurangabad: लेबर कॉलनी प्रकरणी सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेबर कॉलनी
लेबर कॉलनी प्रकरणी सुनावणी

औरंगाबाद : लेबर कॉलनी प्रकरणी सुनावणी

औरंगाबाद : लेबर कॉलनीतील जागा ही शासनाची जागा आहे. तीन दाव्यात, सर्वोच्च न्यायालयात आणि मंत्र्यांपुढे शासनाच्या बाजूने निकाल लागला आहे. कॉस्ट लावून त्यांची याचिका खारीज करावी, असा युक्तीवाद शासनातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांनी न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लड्डा यांच्या खंडपीठात केला. याचिकार्कत्यातर्फे वेळ देण्याची विनंती ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी केली. या याचिकेवर १ डिसेंबर २०२१ रोजी सुनावणी होणार आहे. ॲड. धोर्डे यांनी शासनातर्फे शपथपत्र दाखल केले.

अनेक शासकीय कार्यालयासाठी खासगी इमारती शहरात विविध ठिकाणी भाड्याने घेतल्यामुळे शासनाला दरवर्षी करोडो रुपये भाडे द्यावे लागत आहे. ती सर्व कार्यालये या ठिकाणी एकत्र येतील, त्यामुळे नागरीकांना सोयीचे होईल, असा युक्तीवाद करण्यात आला. यासंदर्भात २०१६ पासून विविध स्तरावरील पत्रव्यवहार खंडपीठासमोर मांडण्यात आला. त्यांना ॲड. प्रवीण पाटील आणि ॲड. उषा वायाळ यांनी सहकार्य केले. मनपातर्फे ॲड. जयंतभाई शहा यांनी काम पाहिले.

loading image
go to top