esakal | तरुणाईच्या मनातील गुंतागुंत उलगडणारा 'विषाद'

बोलून बातमी शोधा

vishad

तेंव्हा आई- बाबा गावी असायचे आणि मी एकटी जालन्यात. जॉबचा वीट आला होता पण फी भरायची होती...

तरुणाईच्या मनातील गुंतागुंत उलगडणारा 'विषाद'
sakal_logo
By
Team eSakal

औरंगाबाद: प्रत्येकाला आपल्याला आयुष्यात एक असा व्यक्ती हवा असतो ज्याच्या समोर आपण पाण्यासारखं पारदर्शक राहू शकू. मनातला सगळा मैल त्याच्या समोर काढून टाकू. पण आमच्या पिढीचं दुर्दैव आहे की, आम्ही आमच्या सोशल लाइफ अन सोशल मित्र मैत्रिणीच्या गुंत्यात भावनांची पारदर्शकता गढूळ करून टाकली आहे. त्या गुंत्यात गुरफटून मरतोय अन त्याला सगळे आत्महत्या म्हणतात.

तसेच काहीसे माझ्या सोबत पण झाले असावे. तेंव्हा आई- बाबा गावी असायचे आणि मी एकटी जालन्यात. जॉबचा वीट आला होता पण फी भरायची होती, त्यामुळे जॉब तर करावाच लागणारच होता. मला लहाणपणापासून आई-आजीने एवढं जपल होत की एकटं राहणं काय असतं हे माहितीच नव्हतं. आई गावी गेल्यावर माझं व्यक्त होणंच बंद झालं होतं. त्यातून एकटेपणा एवढा वाढला की कधी हसणारी खेळणारी मी एकदम शांत झाले होते. हे मला स्वतःला पण समजल नव्हतं.

तेव्हा आम्ही थिअटर करत होतो. मी एकटी शांत बसलेली कसल्याश्या विचारात होते. तेवढ्यात मागून आवाज आला "पिरे, तु ठीक आहेस ना?" आणि कानाचे आणि मनाचे दरवाजे उघडल्या सारखं झाल.. अचानक डोळ्यांवरची झापडी निघाल्या सारखं वाटलं. ते म्हणणार्‍या होत्या आमच्या शर्मिष्ठा कुलकर्णी मॅडम... त्यांनी भलेही ते सहज म्हंटलं पण मला ती हाक अमृताप्रमाणे वाटली. घरी येऊन मी यावर खूप विचार केला आणि वाटलं कअसेच आपल्या सारखे किती तरी लोक असतील या जगात ज्याना त्याच्या एकटेपणाच खाऊन घेत असेल ज्यांच्या की आपले म्हणणारे लोक असूनही ते एकांतात जगत असतील त्यांना गरज आहे "तु ठीक आहेस ना?" म्हणायची आणि तेव्हा मला विषाद सुचली. मी लगेचच माझ्या मित्रांना सांगितले की यावर आपल्याला शॉर्टफिल्म बनवायची आहे.

पण दुर्देवाने की लॉकडाउन लागले. त्याकाळात काही सेलेब्रेटी तसेच तरुण मुला-मुलींच्या आत्महत्या वाढू लागल्या होत्या. तेंव्हा अजूनच ह्या विषयाच्या खोलीत गेले आणि अजून जास्त अभ्यास केला. स्क्रिप्ट रेडी करून मित्रांना पाठवली. तेंव्हा काही प्रमाणात अनलॉक सुरू झाले होते. बाहेर एवढी मोठी आणीबाणी होती पण सर्वजण काहीही कारण न सांगता आले. सर्व काळजी घेऊन काम सुरू केले. कास्ट, व्हाईसओव्हर, म्यूझीक सगळं ठरलं. पण त्याचवेळेच आम्हाला आमच्या स्पॉन्सरने बाउंसर मारला आणि स्पॉन्सरशिप देण्यापासून माघार घेतली. पण आम्हीही हार न मानता काम सुरू ठेवलं.

आमच्या पुढे आव्हान होते ते कॅमेरा आणि कास्टसाठीचे. त्यावरही आम्ही यशस्वी मात केली. सर्वांना जॉब होते पण सर्वांनी जॉब करून या प्रोजेक्टला वेळ दिला. मला आवर्जून सांगाव वाटेल की, आमचा मित्र पवन खांदे ज्याने कधीच सिग्रेट हातात पकडलेली सुद्धा नव्हती आणि त्याला मी डायरेक्ट फुंकायची सांगितल्यावर त्याने तो सीन एका टेक मधे दिला. शेवटचा सिद्धांतचा सीन जिथे त्याला दचकायच होत पण त्याच्या कडून त्या रिऍक्शन येतच नव्हत्या. त्याचे 60 टेक झाले पण त्याच्या कडून होतच नव्हतं. मग आम्ही शक्कल लढवली की मी त्याला लाथ मारेन आणि मग त्याने दचकायचे आणि पोराने अक्षरशः आठ लाता खाल्ल्या होत्या. पण शेवटी त्याने चांगला टेक दिला. 

माझा रडायचा सीन होता मी टेक दिला, खूप रडले, डोळ्यातून पाणी थांबतंच नव्हतं. तेव्हा मात्र पूर्ण सेटचं वातावरण अगदी शांत झालेलं होतं. सर्वांनी मला आधी फक्त हसतानाच बघितलेलं आणि अचानक रडताना बघून कुणाला काय बोलावं हेच सुचेना. पवन आणि सिद्धांत दोघांनी छायाचित्रण केलं आणि त्यांनी विषाद एवढ्या सुंदर प्रकारे कॅप्चर केला आणि तो आमचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला. श्रुती जिने कधीच या आधी कॅमेरा फेस केला नव्हता पण जेंव्हा तिने टेक दिला, तेंव्हा मलाही विश्वास बसेना की ही आमचीच श्रुती आहे ना! .

प्रितेशच्या डोळ्याची सूज एवढी वाढलेली होती की त्रास खूप जास्त होत होता. सर्वात पहिला त्याचा टेक होता आणि त्याच्या निरागस चेहर्‍याने अजूनच विषाद उमटून दिसला. समाधानचा सीन होता तेंव्हा आम्ही थोडे बिचकलो होतो. खूप वेळ लागला होता पण त्याने त्याचे पेशन्स ठेऊन अर्धा तास तसाच खुर्ची वर उभा राहिला. प्रतीकची मदत आम्हाला मोलाची ठरली. वैष्णवी जिचा आवाज आहे त्या पोरीचे तर आम्ही खूप हाडेभाडे घेतले कारण ती पूर्णच ह्या पासुन वेगळी पण तिने ते केलं, असा आमचा एकंदरीत विषाद प्रवास.

म्हणतात ना की, एकदा मनात जिद्दीची गाठ बांधली की त्यापुढे ऊन, वारा, पाऊस, वादळ काहीच दिसत नाही. तसंच काहीसं आमच्या सोबत झालं सर्वांनी म्हणजेच श्रुती, वैष्णवी, पवन खांदे, समाधान, प्रितेश, प्रतीक, पवन आणि सिद्धांत या सर्वांनी मी म्हणेल तसं म्हणेल त्या प्रमाणे सर्व काही केलं. आणि जशी विषाद मी कल्पनेत रंगवली होती हुबेहुब तशीच करून दाखवली तेही झिरो बजेटमध्ये.

(edited by- pramod sarawale)