अजिंठा पायथ्याचं वेताळवाडी जंगल पर्यटकांना घालतंय भुरळ

अजिंठा पायथ्याचं वेताळवाडी जंगल पर्यटकांना घालतंय भुरळ

जरंडी : अजिंठा डोंगररांगेच्या पायथ्याशी वसलेल्या सोयगावच्या वेताळवाडी जंगलाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालून आकर्षित करण्यासाठी खुणावतेय त्यामुळे सोयगावच्या जंगलाच्या वैभवशाली हिरवळीने लोणावळा झाले आहे. कोकणापेक्षाही जास्त हिरवळ या जंगलात झाल्याने जिल्ह्यातील पहिला हिरवळीचा तालुका म्हणून सोयगावची ओळख निर्माण होवू पाहत आहे.

सोयगावच्या जंगलातील वेताळवाडी भागात उंच डोंगरांनी व्यापलेला निसर्गरम्य भाग पर्यटकांसाठी ग्रामीण पर्वणीच ठरली आहे. बुधवारी ता. १२ रात्रीपासून सुरु झालेल्या रिमझिम पावसात या जंगलाचे सौंदर्य आणखीनच खुलल्याने बहारदार निसर्गसहलींचा परिसर म्हणून सोयगावची ओळख ठरू पाहत आहे. शहराच्या हाकेच्या अंतरापासून वेताळवाडीच्या जंगलाला प्रारंभ होतो, या जंगलाच्या कुशीत वाडी, गलवाडा ही दोन गावे दडलेली आहे. वेताळवाडीच्या जंगलात रिमझिम पावसात हिरवळीची झालर वाढतच जात असल्याने सोयगावच्या जंगलाचा अप्रतिम देखावा निर्माण झाला आहे.

वेताळवाडीच्या डोंगरात दडलेला प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून ओळख असलेल्या वाडी किल्लाचे पुरातन अवशेष पर्यटकांना आकर्षित करत असल्याने, निसर्गप्रेमी श्रावणाच्या आधीच वेताळवाडी जंगलाच्या प्रेमात पडलेली आहे. या ठिकाणी श्रावण महिन्याच्या आधीच निसर्ग सौंदर्य खुलल्याने सोयगावचे वैभव आणि महत्व वाढले आहे. अनेक मराठी चित्रपटच्या चित्रीकरण या जंगलात झाले असल्याने रुपेरी पडद्यावर हे जंगल प्रसिद्ध झालेले आहे. मनमोहक सौंदर्य, वाढता हिरवळीचा परिसर, आणि हिंसक वन्यप्राण्यांचे माहेरघर असलेल्या वेताळवाडीला पर्यटनाचा दर्जा देण्याची मागणी निसर्गप्रेमिन्मधून होत आहे.

वनस्पती फुलांनी जंगलाचे वातावरण बदलले
सोयगावच्या वेताळवाडी जंगलात विविध पर्णवनस्पतीची मनमोहक फुलांनी जंगलाचा संपूर्ण भाग डोळ्यांचे पारणे फीटण्यासारखा दिसत असल्याने रंगीबेरंगी रंगांची उधळण जंगलात होत असल्याने आलेल्या हवेच्या झुळूकमुळे रंगीबेरंगी वातावरणात वेगळेच बदल घडवून आल्याचे दिसत असल्याने वेताळवाडीचे जंगल बगीचा झाला आहे, सायंकाळी उशिरापर्यंत या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने परागीकरण करणाऱ्या विविध पक्षांचे थवे सायंकाळी या परिसरात किलबिलाट करत असतात, मधमाशांनी तर मधाची आवक वाढविण्यासाठी या जंगलातील वाढता ओघ पाहून या ठिकाणी मुक्कामच ठोकला आहे.

पर्णवनस्पतींनी आयुर्वेदिक भाज्यांची आवक
वेताळवाडीच्या जंगलात विविध विविध प्रजातीच्या वनस्पती असल्याने नैसर्गिक भाज्यांची आवक मोठी झाली असल्याने सोयगावकरांना आयुर्वेदिक भाज्या खाण्यास मिळत असल्याने पौष्टिक अन्न खाण्यासाठी सोयगावला पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली असल्याने, बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जंगलातून आयुर्वेदिक वनस्पतींच्या भाज्या गोळा करून रोजगार सुरु झाला आहे.

अजिंठा डोंगर रांगांच्या दरीत जंगल
वेताळवाडीचे जंगल अजिंठा डोंगररांगांच्या दरीत वसलेले असल्याने या जंगलाचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे डोंगररांगांच्या व्याप्तीने जंगलाचा भाग वाढता झाल्याने अजिंठ्याच्या डोंगरांची नैसर्गिक शान वाढविण्याचे काम या हिरवळीतून होत असल्याचे दिसून येत आहे.

सायंकाळी पाच वाजेनंतर प्रतिबंधित क्षेत्र
 दरम्यान या जंगलातील वाढत्या हिरवळीमुळे आणि घनदाट झाडीमुळे सायंकाळी पाच वाजेनंतर हिंसक वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठे वाढल्याने वनविभागाच्या वतीने हा भाग पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तशा प्रकारच्या सूचनांचे फलकही वनविभागाने जागोजागी लावले आहे.

वनक्षेत्राची काळजी घेतली
सोयगाव वनविभागाने या जंगलाची मोठी काळजी घेतल्याने या भागात वनविभागाच्या वतीने कुऱ्हाडबंदी केल्याने या भागात घनदाट झाडांची व्याप्ती मोठी दिसून येत आहे, वनविभागाने या परिसरात केलेली वृक्षारोपण हा सौंदर्य वाढविण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com