‘यिनर्स’सह विद्यार्थ्यांना संगणकाशी दोस्तीची संधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

औरंगाबाद - ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आणि अथर्व कॉम्प्युटर्सतर्फे ‘यिनर्स’सह विद्यार्थ्यांना संगणकाशी दोस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत, विद्यार्थी संगणक आणि सीसीटीव्हीशी निगडीत दोन महिन्यांचा कोर्स मोफत करू शकणार आहेत.

औरंगाबाद - ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आणि अथर्व कॉम्प्युटर्सतर्फे ‘यिनर्स’सह विद्यार्थ्यांना संगणकाशी दोस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत, विद्यार्थी संगणक आणि सीसीटीव्हीशी निगडीत दोन महिन्यांचा कोर्स मोफत करू शकणार आहेत.

तरुणाईला बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावत असल्याने शासनस्तरावर अनेक कौशल्यविकासाचे कार्यक्रम सुरू आहेत. यासाठी ‘सकाळ’नेही अथर्व कॉम्प्युटर्सच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल, असे कोर्स विद्यार्थ्यांसाठी मोफत राबविले जाणार आहेत. यामध्ये ‘बेसिक कॉम्प्युटर हार्डवेअर कोर्स’ दोन महिन्यांचा असून, त्यात दोन महिने ॲडव्हान्स ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच ‘सीसीटीव्ही ट्रेनिंग प्रोग्रॅम’ हादेखील दोन महिन्यांचा कोर्स विद्यार्थ्यांना करता येणार आहे.  दहावीनंतरचे विद्यार्थी आणि विशेषतः ‘यिनर्स’ना ही संधी मिळणार आहे. पहिली बॅच ४० जणांची असून, पहिले येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रशिक्षणानंतर परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती अथर्व कॉम्प्युटर्सचे चेतन व्यवहारे आणि योगेश रोडगे यांनी दिली.

एक एप्रिलपासून सुरवात
संगणक आणि सीसीटीव्हीसंबंधित प्रशिक्षणासाठी दिवसातील दोन तास द्यावे लागणार आहेत. एक एप्रिलपासून सकाळी आठ ते दहादरम्यान हा कोर्स सुरू होणार आहे. औरंगाबादेत सी सेक्‍टर, प्लॉट नं. २८, टाऊन सेंटर, एन. १, सिडको येथील अथर्व कॉम्प्युटर्समध्ये हा कोर्स चालेल. यासाठी नावनोंदणी आवश्‍यक असून, विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी चेतन व्यवहारे (मोबाईल - ८६६८९०३५६१), ऐश्‍वर्या शिंदे (७०२८०२६४७७) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: aurangabad news YIN