अबब..चलनातून बाद एक कोटींच्या नोटा आल्या कुठुन?

मनोज साखरे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नोटा पोलिसांनी केल्या जप्त, तीन संशयित ताब्यात 
 

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीनंतर चलनातून शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल एक कोटींच्या बाद झालेल्या नोटा औरंगाबादेत सापडल्या. या नोटा पोलिसांनी जप्त केल्या असुन ही कारवाई गोपाल टी हाऊस येथे गुरुवारी (ता. 26) सायंकाळी करण्यात आली. 

नोटबंदीनंतर देशभरात जुन्या नोटा बॅंकामार्फत गोळा करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही चलनातून बाद झालेल्या औरंगाबादेत नोटा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गोपाल टी हॉटेल, उस्मानपुरा परिसरात पोलिसांनी शब्बीर शहा (वय 40, रा. भानसहीवरा, ता. नेवासा. जि. अहमदनगर) याला संशावरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे 99 लाख 65 हजारांच्या नोटा सापडल्या. या नोटा पाहुन पोलिसही आश्‍चर्यचकीत झाले. शब्बीर शहाची चौकशी केली.

त्यावेळी या नोटा औरंगाबादेतील मोहम्मद नईम मोहम्मद इब्राहीम (वय 45, रा. कटकटगेट) व मोहम्मद इलीयास मोहम्मद युनुस (वय 38, रा. सब्जीमंडी) यांना देण्यासाठी आणल्या गेल्या. चलनातून बाद झालेल्या एक कोटींच्या बदल्यात चलनातील वीस लाख रुपये मिळणार होते. असे त्याने चौकशीत सांगितल्याचे पोलिस म्हणाले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad police seized one crore