10 th,12 th Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकारांना बसणार आळा ; भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास सांकेतांक गोठवणार

दहावी, बारावी परीक्षेत गैरप्रकार किंवा भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास बोर्डाच्या नियमानुसार त्या केंद्राचे संकेतांक गोठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही...
10 th 12 th Board Exam
10 th 12 th Board Examsakal

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावी परीक्षेत गैरप्रकार किंवा भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यास बोर्डाच्या नियमानुसार त्या केंद्राचे संकेतांक गोठविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना विभागीय मंडळाने केंद्रांना दिल्या आहेत.

शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी तर १ मार्च ते २६ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षण मंडळाकडून तयारी सुरू आहे. त्यानुषंगाने विभागीय शिक्षण मंडळातर्फे नुकतीच विभागातील सर्व जिल्हानिहाय मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी परीक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात एकाच बेंचवर एकच विद्यार्थी असावा, परीक्षेतील गैरप्रकार टाळावेत, परीक्षेत मुलांना बसण्यासाठी मंडप उभारू नये, पिण्याचे पाणी, फॅन, लाइट अशा भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात, केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

10 th 12 th Board Exam
Sambhaji Nagar : आश्रमशाळेत ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा ; दुधातून विषबाधा झाल्याची घटना

हमीपत्रात म्हटलेय काय?

दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळाने केंद्रसंचालकांकडून हमीपत्र भरून घेतले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक वर्गात केवळ २५ विद्यार्थी असतील. परीक्षा कक्षात योग्य असा प्रकाश, पंखे, लाइट अशी सुविधा असेल. पर्यवेक्षणासाठी मान्यताप्राप्त शाळेतील नियमित शिक्षक असेल. ओळखपत्रानुसारच कर्मचाऱ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाईल इतरांना दिला जाणार नाही.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याची आवश्यक ते पथक नियुक्त करून तपासणी करण्यात येईल. कोणताही परीक्षार्थी अवैध साहित्य अथवा कागद सोबत घेऊन परीक्षा दालनात प्रविष्ट होणार नाही. तपासणी सीसीटीव्हीच्या निगराणीत होईल. त्याचे फुटेज परीक्षा संपेपर्यंत जतन करण्यात येईल. परीक्षा कालावधीत ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचा शिक्षक केंद्रावर आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. यास मी जबाबदार असेल, असे पत्र केंद्रसंचालकांकडून बोर्डाने भरून घेतले आहे.

10 th 12 th Board Exam
Sambhaji Nagar : आश्रमशाळेत ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा ; दुधातून विषबाधा झाल्याची घटना

दहावी, बारावी परीक्षेच्या अनुषंगाने केंद्रसंचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये केंद्रसंचालकांकडून गैरप्रकार व भौतिक सुविधासंदर्भात हमीपत्र भरून घेतले आहे. तरीही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार अथवा भौतिक सुविधांचा अभाव आढळून आल्यास बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करून संकेतांक गोठवण्यात येईल.

- डॉ. वैशाली जामदार, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ

बारावी

प्रविष्ट विद्यार्थी : १,७९,०१४

एकूण महाविद्यालये :१,४०८

परीक्षा केंद्रे : ४४९

परीरक्षक केंद्रे : ५८

दहावी

प्रविष्ट विद्यार्थी : १,८६,८१४

शाळांची संख्या : २,७३७

परीक्षा केंद्रे : ६३८

परीरक्षक केंद्रे : ६३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com